Jalgaon Earthquake Team Lokshahi
ताज्या बातम्या

Jalgaon Earthquake : जळगाव जिल्ह्याला भूकंपाचे धक्के

जळगाव जिल्‍ह्यातील भुसावळ शहर व सावदा परिसरात आज सकाळी भुकंपाचे सौम्‍य झटके बसले आहेत.

Published by : shweta walge

जळगाव जिल्‍ह्यातील भुसावळ शहर व सावदा परिसरात आज सकाळी भुकंपाचे सौम्‍य झटके बसले आहेत. ही घटना आज सकाळी 10.35च्या सुमारास घडली असून 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे झटके जाणवले आहेत. यामुळे नागरीकांमध्‍ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्‍हा प्रशासनाने दिलेल्‍या माहितीनुसार जळगाव जिल्‍ह्यातील भुसावळ व सावदा परिसरात सकाळी 10 वाजून 35 मिनिटांच्‍या सुमारास भुकंपाचे सौम्‍य धक्‍के जाणवले. रेक्‍टर स्‍केलवर ३.३ ऐवढी तिव्रता नोंदली गेली.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात भुकंपाचे धक्के बसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहेत. दरम्यान, भूकंपामुळे कुठे नुकसान किंवा हानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही.

भुसावळ सावदा येथे भूकंपाचे धक्के बसले ची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिली असून, नागरिकांनी घाबरून जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा