Jalna Riots  Team Lokshahi
ताज्या बातम्या

शिवरायांचा पुतळा हटवण्यावरुन वाद; जालन्यात दगडफेकीनंतर पोलिसांकडून गोळीबार

गावच्या प्रवेशद्वाराला गोपीनाथ मुंडे प्रवेशद्वार असं नाव देण्यात आलं, त्यावरुनही वाद निर्माण झाला आहे.

Published by : Sudhir Kakde

जालना | रवी जैस्वाल : छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा आणि गावच्या प्रवेश द्वारावरील गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) प्रवेशद्वार लिहिलेलं बॅनर हटवण्यावरून जालन्यात मोठा वाद (Riots in Jalna) झाला. संतप्त जमावाने यावेळी पोलिसांवर दगडफेक केली. भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को या गावात ही घटना घडली असून, पोलिसांनी (Jalna Police) यावेळी हवेत गोळाबार देखील केला. या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

जालन्यातील चांदई एक्को गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यावरून वाद निर्माण झालाय. गावच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता. तर पुतळ्याजवळच गावच्या प्रवेशद्वाराला गोपीनाथ मुंडे प्रवेशद्वार असं नाव देण्यात आलं. यावरून गावकऱ्यामध्ये वाद झाला. त्यामुळे प्रशासननाने प्रवेश द्वारावरील गोपीनाथ मुंडे असं नामकरण करण्यात आलेलं बॅनर काढून छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.

जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी हलवण्यात आलंय. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : महाराष्ट्र जेव्हा एकवटतो पेटून उठतो तेव्हा काय होतं हे त्यांना समजलं असेल - राज ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश