jammukashmir 
ताज्या बातम्या

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला धूळ चारत नॅशनल कॉन्फरन्स सर्वात मोठा पक्ष ठरला

काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 हटविल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस यांच्या आघाडीने बहुमाताचा आकडा पार केला आहे.

Published by : Team Lokshahi

साधारण 10 वर्षांनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 हटविल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस यांच्या आघाडीने बहुमाताचा आकडा पार केला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्या आघाडीनं बहुमताचा आकडा पार करत तिथं भाजपला धूळ चारली. कलम ३७० हटवूनही तिथं भाजपच्या पदरी निराशाच पडली. हरयाणा काय किंवा जम्मू - काश्मीर निवडणूका काय या दोन्ही निवडणुकांचे निकाल महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच बिगुल वाजण्यापूर्वी लागल्यानं या निवडणूकांचा परिणाम महाराष्ट्रात जाणवणार हे नव्यानं सांगण्याची गरज नाही

दुपारी 4 वाजताच्या अपडट्सनुसार जम्मू काश्मीरमध्ये भाजप- 29, नॅशनल कॉन्फरन्स 42, काँग्रेस 6, पीडीपी-4 आणि इतर 9 उमेदवार जागांवर आघाडीवर होते. एनसीचे नेते ओमर अब्दुल्ला तब्बल 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

मुख्यमंत्री म्हणून ओमर अब्दुल्ला यांच्या नावाची घोषणा

फारुख अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्री म्हणून ओमर अब्दुल्ला यांच्या नावाची घोषणा केली आहे. यापूर्वी ते 2009 ते 2015 या काळात राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी दोन जागांवरुन निवडणूक लढवली होती. गंधरबल आणि बदगाम या मतदारंसघातून अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यानुसार त्यांची नेटवर्थ काश्मीरमधल्या इतर राजकीय नेत्यांपेक्षा कमी आहे. त्यांच्याकडे ना स्वतःचं घर आहे ना कार. शिवाय त्यांचा कोणता व्यवसायदेखील नाही. केवळ 95 हजार रुपये कॅश ओमर अब्दुल्ला यांचा खर्च नेमका कसा भागतो, हे पाहाणंही महत्त्वाचं आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे 54 लाख रुपयांची संपत्ती आहे. परंतु नगदी केवळ 95 हजार रुपये आहेत. यासह काही बँकांमध्ये त्यांनी फिक्स डिपॉझिट केलेले आहेत. यामध्ये एचडीएफी बँकेत 19 लाख 16 हजार रुपये, एसबीआय बँकेत 21 हजार 373, एचडीएफसी श्रीनगर बँकेत 2 लाख 20 हजार 930 रुपये, जे ऍड बँकेत 1 लाख 91 हजार 745 रुपये. तसेच त्यांच्याकडे 30 लाख रुपयांचे दागिने आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा