ताज्या बातम्या

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; लष्कराचे ३ जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. तर, तीन जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केल्याचे समजत आहे.

वृत्तानुसार, 20 डिसेंबरच्या रात्रीपासून राजौरीतील थानमंडीमध्ये कारवाई सुरू आहे. 21 डिसेंबर रोजी दुपारी 3.45 च्या सुमारास लष्कराची दोन वाहने ऑपरेशन साईटवर पोहोचली, या गाडीवर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर लष्कराकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यादरम्यान लष्कराचे तीन जवान शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत.

लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, बुफलियाजमध्ये रात्रीपासून दहशतवाद्यांविरोधात घेराव आणि शोध मोहीम सुरू आहे. सैनिक एका मोहिमेवर जात होते आणि याच दरम्यान त्यांच्यावर हल्ला झाला. अद्यापही परिसरात चकमक सुरू आहे. घटनास्थळी अतिरिक्त सैनिक पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा