ताज्या बातम्या

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात श्रीनगर पोलीस शहीद; मुलाचा 2 वर्षांपूर्वी झाला होता एन्काऊंटर

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद.

Published by : Sudhir Kakde

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये पोलीस दलावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कॉन्स्टेबल मुश्ताक अहमद शहीद झाले. मुश्ताक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुंटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मुश्ताक यांचं पार्थिव त्यांच्या घरी पोहोचलं तेव्हा त्यांचं कुटुंबातले सारेच सदस्य धाय मोकळून रडातानाचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. देशसेवा करताना वीरमरण आलेल्या मुश्ताक यांचा मुलगा आकिब दोन वर्षांपूर्वी पोलीस चकमकीत मारला गेला होता. त्याच्यावर दहशतवाद्यांसाठी काम केल्याचा आरोप होता.

काश्मीरमधील लाल बाजार भागात मंगळवारी एका चौकीवर दहशतवाद्यांनी कॉन्स्टेबल मुश्ताक अहमद यांच्यावर हल्ला केला. यामध्ये 56 वर्षांचे मुश्ताक अहमद हे शहीद झाले. तर फयाज अहमद आणि अबू बकर हे दोन कॉन्स्टेबल जखमी झाले. जखमी जवानांवर सध्या उपचार सुरू आहेत. कॉन्स्टेबल मुश्ताक अहमद यांच्या हत्येची जबाबदारी 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया'ने (ISIS) स्वीकारली असल्याचं काही बातम्यांमधून समोर आलं आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही.

दोन वर्षांपूर्वी कुलगामच्या चकमकीत मुलाला केलं होतं ठार

एप्रिल 2020 मध्ये आकिबला त्याच्‍या घारपसून काही किलोमीटर अंतरावर सुरक्षा मोहिमेदरम्‍यान पोलिस दलाने गोळ्या घालुन ठार केलं होतं. कुलगामध्ये झालेल्या या चकमकीत चार अतिरेकी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर त्यांना आकिबचा मृतदेह सपडला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा