भारत आणि पाकिस्तानने गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्य करार केला आहे, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी सांगितले आणि भारत दहशतवादाविरुद्ध आपली ठाम आणि तडजोड न करणारी भूमिका कायम ठेवेल असे नमूद केले.
रविवारी भारतीय हवाई दलाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही आणि ते अजूनही सुरू आहे. भारतीय हवाई दलाने म्हटले आहे की ही कारवाई जाणीवपूर्वक आणि गुप्त पद्धतीने करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, भारतीय हवाई दल प्रमुख अमर प्रीत सिंह आणि भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्यासमवेत उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवल्यानंतर भारतीय हवाई दलाचे हे वक्तव्य आले.
"भारतीय हवाई दलाने (IAF) ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामे अचूक आणि यशस्वीरित्या पार पाडली आहेत. राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत आणि विवेकी पद्धतीने ऑपरेशन्स पार पाडण्यात आल्या," असे IAF ने म्हटले आहे. त्याचप्रमाणे, आयएएफने सर्वांनाअफवांपासून सावध राहण्यास सांगितले आहे. "तसेच कार्यवाही अजूनही सुरू असल्याने, योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल. आयएएफने सर्वांना अनुमान लावण्यापासून आणि खोटी माहिती प्रसारित करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे". असे त्यात म्हटले आहे.