ताज्या बातम्या

India VS Pak : युद्धाच्या कल्पनेनेच पाकिस्तान घाबरला ? संसदेमध्ये खुर्च्या रिकाम्या आणि...

आता पाकिस्तानच्या संसद भावनातील एक फोटो समोर आला आहे.

Published by : Shamal Sawant

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली. भारत कधी हल्ला करणार या विचारात सध्या पाकिस्तानमध्ये बैठकांचे सत्र आयोजित करण्यात येत आहे. अशातच आता पाकिस्तानच्या संसद भावनातील एक फोटो समोर आला आहे. सोमवारी संध्याकाळी पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीमध्ये एक स्पेशल सेशन घेण्यात आले. यावेळी पहलगाम हल्ल्यानंतर भारतावरच्या कारवाईबद्दल चर्चा करण्यात येणार होती. पण यावेळी खूप कमी सदस्य दिसून आले.

ज्या मुद्द्यावर पाकिस्तानी खासदार वेगवेगळ्या व्यासपीठावरून मोठी विधाने करत आहेत, त्याच मुद्द्यावर चर्चा सुरू असताना पाकिस्तानची संसद रिकामी होती. कोणताही खासदार भारत आणि भारतीय सैन्याविरुद्ध काहीही बोलू इच्छित नव्हता. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे खासदार शेर अफजल खान मारवत म्हणाले की, "जर भारताने हल्ला केला तर ते लढणार नाहीत तर इंग्लंडला पळून जाणार".

पाकिस्तानच्या नेत्यांनीच नाही तर त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांनीही त्यांचे कुटुंब वेगवेगळ्या देशांमध्ये स्थलांतरित केले आहे. त्यांना माहित आहे की जर भारताशी युद्ध झाले तर 4 दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होईल कारण त्यांच्याकडे भारताशी लढण्याची क्षमता नाही.

पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देतो :

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी त्यांच्या एका मुलाखतीत कबूल केले होते की पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देतो. त्याच मुलाखतीत त्यांनी अमेरिका आणि ब्रिटनचे नाव घेतले आणि त्यांच्यावर त्यांच्या इशाऱ्यावरून हे केल्याचा आरोप केला. ख्वाजा आसिफ यांचे हे विधान अमेरिका आणि ब्रिटनवर दबाव आणण्यासाठी एक राजनैतिक पाऊल मानले जाते, जेणेकरून हे दोन्ही देश एकत्रितपणे भारतावर युद्ध सुरू करू नये यासाठी दबाव आणू शकतील. कारण पाकिस्तानकडे युद्ध लढण्यासाठी पुरेसे शस्त्रे शिल्लक नाहीत.

पाकिस्तान सैन्याला भीती :

पाकिस्तानच्या सैन्याला भीती आहे की जर भारताने मोठे युद्ध सुरू केले तर त्यांना फक्त 96 तासांत शरणागती पत्करावी लागेल. आणि आता त्याची आर्थिक स्थिती अशी नाही की ते इतर देशांकडून शस्त्रे खरेदी करू शकेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा