ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : मन हेलावून टाकणारी दहशतवादी हल्ल्यातील भयानक दृष्य आली समोर

दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटाला लक्ष्य केले आणि त्यात 28 लोकांचा मृत्यू झाला. तर काही लोक जखमी झाले आहेत.

Published by : Rashmi Mane

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यादरम्यान, दहशतवाद्यांनी बनावट गणवेश परिधान केले होते. त्यामुळे सुरुवातीला कोणत्याही पर्यटकाला त्यांच्यावर संशय आला नाही. पण काही वेळाने, जेव्हा त्यांनी हिंदू पर्यटकांची ओळख विचारली आणि त्यांच्यावर गोळीबार सुरू केला, तेव्हा घटनास्थळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील बैसरन येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटाला लक्ष्य केले आणि त्यात 28 लोकांचा मृत्यू झाला. तर काही लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

दहशतवादी हल्ल्याच्या वेळेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की जेव्हा दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करायला सुरुवात केली तेव्हा घटनास्थळी गोंधळाची आणि भिती परिस्थिती निर्माण झाली. एक व्हिडिओ माध्यमांसमोर आला आहे, ज्यामध्ये काश्मीरच्या दऱ्या दिसत आहेत, पण व्हिडिओ पाहून आनंद होत नाही, उलट लोकांच्या किंकाळ्या ऐकू येतात.

व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीचा आवाजही व्हिडिओमध्ये ऐकू येतो, जो तो किती घाबरला आहे आणि त्याला पुढे पाहण्यास सांगत आहे, हे दाखवतो. दरम्यान, एक मोठा स्फोट ऐकू येतो आणि सर्व बाजूंनी ओरडण्याचा आवाज येतो, तर काही लोक धावतानाही दिसतात. हल्ल्याच्या वेळीचे दृश्य वर्णन करणे खूप कठीण आहे, पण व्हिडिओ पाहून, लोकांच्या मनावर दहशतीचा किती परिणाम झाला असेल, याची कल्पना करता येते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा