ताज्या बातम्या

जपानची चंद्राकडे झेप! पहाटेच लाँच केलं रॉकेट

Published by : Siddhi Naringrekar

जपानच्या चांद्र मोहिमेची तयारी गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. आता जपानने चंद्राकडे झेप घेतली आहे. जपानने चंद्रावर एक एक्स-रे टेलिस्कोप आणि एक छोटं लँडर पाठवलं आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जपान पाचवा देश ठरणार आहे.

भारतीय वेळेनुसार आज पहाटे 5:12 वाजता H2-A रॉकेटसोबत जपानने दोन अंतराळ यान लाँच केले. भारताने काही दिवसांपूर्वीच चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडली. त्यानंतर आता जपानने चंद्राकडे झेप घेतली आहे.

दोन टप्प्यांमध्ये टेलिस्कोप आणि लँडर रॉकेटपासून वेगळे झाले. आता या दोघांना चंद्रावर पोहोचण्यासाठी सुमारे चार महिन्यांचा वेळ लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक