Pravin Darekar on CM Devendra Fadnavis : देवाभाऊंचा मास्टरस्ट्रोक ! देरकरांकडून फडणवीसांचं कौतुक Pravin Darekar on CM Devendra Fadnavis : देवाभाऊंचा मास्टरस्ट्रोक ! देरकरांकडून फडणवीसांचं कौतुक
ताज्या बातम्या

Pravin Darekar X Post : देवाभाऊंचा मास्टरस्ट्रोक ! देरकरांकडून फडणवीसांचं कौतुक

पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण अखेर यशस्वी झाले.

Published by : Riddhi Vanne

Pravin Darekar on CM Devendra Fadnavis : पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण अखेर यशस्वी झाले. राज्य सरकारने मराठा समाजाच्या आठ पैकी सहा प्रमुख मागण्या मान्य करत त्यासंदर्भात सुधारित जीआर काढला. मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा जीआर जरांगे पाटलांना सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. याचपार्श्वभूमीवर मंत्री प्रवीण दरेकर यांनी x पोस्ट टाकत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरेकरांनी x वर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

काय लिहिलयं प्रवीण दरेकरांनी X पोस्टमध्ये,

देवाभाऊंचा मास्टरस्ट्रोक !!

देवा भाऊ मनःपूर्वक अभिनंदन व आभार !

मराठा समाजच्या हितासाठी कालही प्रामाणिक होतात आजही आहात आणि उद्याही राहाल हे शासन निर्णयातून दाखवून दिलंत. प्रसंगी आरोप, टीकाही सहन केल्यात !

तमाम समाज बांधवांना आपला अभिमान आहे, पूर्ण विश्वास आहे व राहील.

धन्यवाद देवभाऊ !!!

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मराठा आरक्षण मुद्द्यावरून दुपारी 12 वाजता राज्य मंत्री मंडळाची आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक

Horoscope | 'या' राशीच्या लोकांच्या कामानिमित्त मोठ्या व्यक्तींशी भेटीगाठी होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Nagpur Emergency landing : विमानाला पक्षी धडकल्यानं विमानाचं इमर्जन्सी लैंडिंग