ताज्या बातम्या

Jarange Patil: बीड घटने प्रकरणी कारवाई करायला एवढे दिवस का लागतात? जरांगेंचा फडणवीसांना सवाल

बीड घटनेवर मनोज जरांगे पाटील आक्रमक, फडणवीसांना विचारले प्रश्न. 25 जानेवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा.

Published by : Team Lokshahi

बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणा वरचं राजकारण आता आणखी तापताना दिसत आहे. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत हे प्रकरण दाबू दिलं जाणार नाही असा इशाराच दिला आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी काही प्रश्न विचारले. मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसत आहे. 25 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचं ते सांगत आहेत.

हे प्रकरण दबू देणार नाही कोणी ही येऊ देत- जरांगे पाटील

याचपार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 28 तारखेला बीड जिल्ह्यातील जनतेच्या वतीनं मोर्चा ठेवला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या जनतेनं देशमुखांच्या कुटुंबाच्या ज्या मागण्या आहेत त्या पुर्ण करण्यासाठी यात सहभागी व्हायचं आहे... त्यामुळे आपण सर्व जण त्यांच्या कुटुंबाला बळ देऊयात. आता हे प्रकरण दबू देणार नाही कोणी ही येऊ देत.

बीड जिल्ह्यातील जनतेनं तपास हाती घेतला मग सरकारला कळेल-जरांगे पाटील

पुढे जरांगे पाटील म्हणाले की, शोध लावायला आणि तपास करण्यासाठी एवढे दिवस लागतात का? त्यांचा तपास त्यांच्याजवळ, एकदा जर बीड जिल्ह्यातील जनतेनं तपास हाती घेतला मग सरकारला कळेल. 25 जानेवारीला आंतरवालीच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील गावावातील मराठी यायची तयारी करायला लागले आहेत. सगळ्या मराठा समाजाने खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. आपणचं आपलं गाव संभाळायचं आहे. आपल्या गावात आपणचं बैठक घ्यायची कोणाची वाट पाहायची नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा