ताज्या बातम्या

येवल्यात जरांगे - भुजबळांचे समर्थक आमने - सामने

मनोज जरांगे यांनी शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर ते आपल्या सभास्थळाच्या दिशेला निघाले. पण यावेळी अचानक मराठा कार्यकर्ते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक आमनेसामने आले.

Published by : Team Lokshahi

मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आज येवला दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे यांनी येवल्यात आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यानंतर त्यांना येवल्यात शिवसृष्टी उभारण्यात आली असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील शिवसृष्टी उभारलेल्या ठिकाणी शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आले. मनोज जरांगे यांनी शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर ते आपल्या सभास्थळाच्या दिशेला निघाले. पण यावेळी अचानक मराठा कार्यकर्ते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी शिवसृष्टीसमोर ठिय्या मांडला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली