Jasprit Bumrah Angry Jasprit Bumrah Angry
ताज्या बातम्या

Jasprit Bumrah Angry : आधी व्यवस्थित बोलणं, नंतर बुमराहचा संताप, नेमकं काय घडलं? , पाहा Video

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-20 सामना खेळला न जाता रद्द करण्यात आला आहे. हा सामना 17 डिसेंबर रोजी लखनऊमधील एकाना स्टेडियमवर होणार होता.

Published by : Riddhi Vanne

Jasprit Bumrah Angry Airport Video : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-20 सामना खेळला न जाता रद्द करण्यात आला आहे. हा सामना 17 डिसेंबर रोजी लखनऊमधील एकाना स्टेडियमवर होणार होता. पाच सामन्यांच्या मालिकेतील हा सामना निकालासाठी महत्त्वाचा मानला जात होता. मात्र दाट धुक्यामुळे सामना होऊ शकला नाही.

दरम्यान, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे. या व्हिडीओमध्ये बुमराह चिडलेला दिसत असून, त्याने एका चाहत्याचा मोबाईल हातातून घेतल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. ही घटना विमानतळावरील असून, बुमराह रांगेत उभा असताना ही बाब घडली.

नेमकं काय घडलं?

बुमराह विमानतळावर उभा असताना त्याच्या बाजूला एक चाहता होता. बुमराह जवळ दिसताच त्या चाहत्याने कोणतीही परवानगी न घेता मोबाईलवर व्हिडीओ शूट करायला सुरुवात केली. सुरुवातीला बुमराहने शांतपणे त्याला व्हिडीओ बंद करण्यास सांगितलं आणि इशाराही केला. मात्र तरीही चाहत्याने ऐकलं नाही. त्यामुळे अखेर बुमराहचा संयम सुटला आणि त्याने त्या चाहत्याचा फोन हातातून घेतला.

दोघांमध्ये झालेला संवाद

या घटनेवेळी बुमराह आणि चाहत्यामध्ये थोडक्यात संवाद झाला.

चाहता : सर, मी तुमच्यासोबत येऊ का?

बुमराह : फोन पडला तर जबाबदारी माझी घेणार का?

चाहता : काही हरकत नाही सर.

बुमराह : ठीक आहे.

यानंतर बुमराहने फोन बाजूला केला आणि हा प्रकार संपला. हा सगळा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या त्यावर मोठी चर्चा सुरू आहे.

टी-२० मालिकेतील बुमराहची कामगिरी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत जसप्रीत बुमराह भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पहिल्या सामन्यात त्याने दोन बळी घेतले होते. दुसऱ्या सामन्यात मात्र त्याला यश मिळालं नाही. तिसरा सामना वैयक्तिक कारणामुळे तो खेळू शकला नाही. चौथा सामना रद्द झाला असून, मालिकेतील शेवटचा सामना १९ डिसेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा