ताज्या बातम्या

Jasprit Bumrah : बूम.. बूम... बुमराह ठरला मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; मलिंगाला टाकलं मागे

जसप्रीत बुमराहने एडन मारक्रमची विकेट घेत लसिथ मलिंगाला मागे टाकत संघाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

Published by : Rashmi Mane

आयपीएलच्या 45 व्या सामन्यात 'मुंबई इंडियन्स' (एमआय) आणि 'लखनौ सुपर जायंट्स' (एलएसजी) संघ एकमेकांशी भिडले. रविवारी दुपारी मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं एलएसजीवर 54 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिली फलंदाजी घेत एमआयने 7 गडी गमावून 215 धावा केल्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये एलएसजीने केवळ 161 धावा बनवल्या. आजच्या सामन्यात एमआयच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत एलएसजीच्या सर्व खेळाडूंना बाद केले. त्यामुळे एमआयची टीम आता गुण तक्त्यात थेट दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. जसप्रीत बुमराहने तिसऱ्या षटकात मुंबईला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. या विकेटसह जसप्रीत बुमराहने मोठी कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराहने एका षटकात ३ विकेट्स घेतले.

जसप्रीत बुमराहने एडन मारक्रमची विकेट घेत लसिथ मलिंगाला मागे टाकत संघाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. मलिंगाने १७० विकेट घेतल्या होत्या. तर बुमराहने त्याला मागे टाकत आता १७४ विकेट्सचा आकडा गाठला आहे.

बुमराहने 4 षटकांत 5.50 च्या इकॉनॉमीने 22 धावा दिल्या. तर 4 फलंदाजांची विकेट घेतली. त्याने तिसऱ्या षटकात गोलंदाजीला येत एडन मारक्रम जाळ्यात फसवत बाद केलं आणि संघाला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. तर बुमराहने नंतर १६ व्या षटकात ३ विकेट्स घेत मुंबईचा विजय निश्चित केला. एलएसजीच्या डावाच्या १६ व्या षटकात जसप्रीत बुमराहने विकेट्सची रांग लावली. या षटकात बुमराहने एकूण ३ फलंदाजांच्या विकेट घेतल्या. त्याने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डेव्हिड मिलरला आऊट केले. यानंतर, पाचव्या चेंडूवर अब्दुल समदला क्लीन बोल्ड केले. त्याचवेळी, षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आवेश खान त्याचा बळी ठरला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा