ताज्या बातम्या

Nagpur Couple Accident in Italy : नागपूरमधील जोडप्याचा इटलीत मृत्यू! पती-पत्नीचा मृत्यू तर मुलगी...

नागपूरमधील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नीचा इटलीत झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर नागपूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published by : Prachi Nate

नागपूरमधील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नीचा इटलीत झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या 24 वर्षीय मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर नागपूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात इटलीतील ग्रोसेटो (Grosseto) शहरात झाला. अख्तर दाम्पत्य आपल्या मुलीसोबत इटलीत फिरण्यासाठी गेले होते. प्रवासादरम्यान त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. मुलगी गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

भारतीय दूतावासातील अधिकारी स्थानिक प्रशासन आणि रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपर्कात असून, पीडित मुलीला आवश्यक ती सर्व मदत केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच अख्तर कुटुंबाच्या नातेवाईकांशीही दूतावासाकडून सतत संपर्क ठेवला जात आहे.

जावेद अख्तर हे नागपूरमधील प्रसिद्ध ‘गुलशन प्लाझा’ हॉटेलचे मालक होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने व्यावसायिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. शहरातील व्यावसायिक आणि परिचित मंडळींनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या घटनेनंतर नागपूरमध्ये शोकाकुल वातावरण असून, अख्तर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भारतीय दूतावासाकडून मृतदेह स्वदेशात आणण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा

Rain Alert : पुढील काही दिवस पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार...

Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death : उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं खुलं आव्हान

Pomegranate Vs Beetroot : डाळिंब की बीट... शरीरात रक्त वाढवण्यासाठी काय जास्त फायदेशीर आहे?

Devendra Fadnavis : ठाकरे गटाच्या मेळाव्यावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....