ताज्या बातम्या

Air India plane crash : आईला भेटण्यासाठी आलेल्या जावेद आणि त्याच्या कुटुंबाने अहमदाबादमधील विमान अपघातात गमावला जीव

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात जावेद अली आणि त्यांचे संपुर्ण कुटूंब हे मरण पावलं आहे. ते त्यांच्या आईला भेटण्यासाठी गोरेगावला आले होते.

Published by : Prachi Nate

12 जून रोजी काल गुजरात मधील अहमदाबादमध्ये एअरइंडिया च्या अहमदाबाद येथून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI171 या ड्रीमलाइनर विमानाचा भीषण अपघात झाला. या विमानात 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला. हे विमान अहमदाबादच्या विमानतळावरून आकाशात झेपावल्या नंतर अवघ्या काही क्षणातच काही तांत्रिक बिघाडामुळे हे विमान मेघानी या नागरी परिसरात कोसळले आणि तिथे एकच हाहाकार उडाला. हा अपघात इतका भीषण होता की यामधील केवळ एक प्रवासी सुदैवाने वाचला बाकीच्यांना दुर्दैवाने आपले प्राण गमवावे लागले. या अपघातात मुंबई मधील गोरेगाव येथील संपूर्ण कुटुंबाला आपला प्राण गमवावा लागला. या बातमी मुले संपूर्ण गोरेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

गोरेगाव मध्ये राहणारे जावेद अली त्यांची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांना या विमान अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. जावेद अली हे गेल्या 12 वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते. त्यांना लंडनचे नागरिकत्व ही मिळाले होते. त्यांच्या पत्नी देखील मूळच्या लंडनच्या होत्या. त्या दोघांना एक 4 वर्षांची मुलगी आणि एक 8 वर्षांचा मुलगा होता. जावेद अली हे जरी लंडनला राहत असले तरी त्यांची आई मात्र भारतात मुंबईमधील गोरेगाव येथे वास्तव्यास होती. काही दिवसांपासून त्यांच्या आई ची तब्बेत ठीक नव्हती.

त्यामुळे त्यांच्या आईच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. त्यानुसार आईच्या ऑपेरेशनसाठी आणि आपल्या आईला भेटण्यासाठी जावेद अली हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह 7 दिवसांच्या सुट्टीवर मुंबईमध्ये आले होते. काल हे चार ही जण परत आपल्या लंडन च्या घरी जाण्यासाठी निघाले. ज्या विमानाने हे चार ही जण परतीच्या प्रवासाला गेले होते त्या विमानाचा काल भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये या संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला. या अपघाताची बातमी समजताच त्यांच्या आई ला अश्रू अनावर झाले. या संपूर्ण घटनेमुळे गोरेगाव परिसरात दुःखाचे वातावरण आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

11th Addmission Date Extend : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; आता 'या' तारेखपर्यंत घेता येणार प्रवेश