उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरी सनई चौघडे वाजणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवारचा साखरपुडा 10 एप्रिलला पार पडणार आहे. अजित पवारांचे चिरंजीव जय पवार लग्नबंधनात अडकणार आहे.
साखरपुड्याआधी जय पवार यांनी आजोबांची भेट घेत शरद पवार आणि कुटुंबाचे आशीर्वाद घेतलं. ऋतुजा पाटील या मूळच्या फलटणच्या असून फलटणचे प्रवीण पाटील यांच्या त्या कन्या आहेत.
सुप्रिया सुळेंनी फेसबुकवर याचा एक फोटो शेअर केला आहे. जय पवार आणि त्यांच्या भावी पत्नीचे फोटो शेअर करत सोशल मीडियावरुन त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आता या फोटोची चर्चा रंगली असून साखरपुड्याच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.