विधानसभा अध्यक्षांनी जयकुमार गोरेंचा हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला असून समितीकडे तो पाठवण्यात आला आहे. बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी मंत्री जयकुमार गोरे यांनी संजय राऊत, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि यूट्युब चॅनलविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. यादरम्यान जयकुमार गोरे सभेत म्हणाले की, 2019 मध्ये सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात माझी निर्दोष मुक्तता केली आहे.
त्याबाबतचा निकाल समोर आला आहे. या प्रकरणांमध्ये न्यायालयाने सुद्धा निर्णय दिला होता की, सर्व पुरावे नष्ट करून टाकण्यात यावे. तरी सुद्धा संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांचा वापर करून माझी जाणीवपुर्वक बदमानी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर मी हक्कभंग प्रस्ताव टाकत आहे असं ते म्हणाले आहे.
नेमक प्रकरण काय?
2015-16 दरम्यान जयकुमार गोरे यांनी एका महिलेला अश्लील इमेजेस आणि शिवीगाळ करून प्रचंड त्रास दिला होता. त्यानंतर 2017 मध्ये त्यांच्यावर न्यायालयीन खटला दाखल करण्यात आला होता. 2019 मध्ये जयकुमार गोरे निवडून आल्यानंतर या केसचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी त्या महिलेला कोर्टामध्ये दंडवत घातला होता. महिलेला लेखी माफीनामा देऊन त्यामध्ये पुन्हा अशी चूक होणार नाही असा उल्लेख केला होता. यामुळे त्या महिलेने ही केस 2019 मध्ये मागे घेतली होती. केस मागे घेतल्यामुळे ते निर्दोष मुक्त झाले.