Jayant Patil Press Conference
Jayant Patil Press Conference 
ताज्या बातम्या

NCP : शरद पवार गटाची यादी जाहीर, जयंत पाटील यांनी केली ५ उमेदवारांच्या नावाची घोषणा

Published by : Naresh Shende

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) पाच उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे, दक्षिण नगरसाठी निलेश लंके आणि दिंडोरीतून भास्कर भगरे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व मान्यवरांना आणि पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडी आहे. त्यात समाजवादी पार्टी आहे. शेतकरी कामगार पक्ष आहे. असे महाराष्ट्रातले मोठे पक्ष आमच्यासोबत आहेत. भारतीय जनता पक्षाला पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वांनीच एकीचं बळ दाखवण्याची आवश्यकता आहे. वेगळं उभं राहण्याची काही लोकांची भूमिका असेल, तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील मतं फुटतील आणि भाजपला त्याचा फायदा होईल. याचा विचार करुन सर्वजण एकसंध होण्याचा विचार करुया.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरद पवार गटाचे पाच उमेदवार

१) अमर काळे - वर्धा लोकसभा मतदार संघ

२) सुप्रिया सुळे - बारामती लोकसभा मतदार संघ

३) अमोल कोल्हे - शिरुर लोकसभा मतदार संघ

४) निलेश लंके - दक्षिण नगर

५) भास्कर भगरे - दिंडोरी लोकसभा मतदार संघ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा