ताज्या बातम्या

Jayant Patil : निवडणुकीतील लाट केवळ एकदाच येते म्हणूनच नव्या वर्षात एक नवीन सुरुवात करूया

राजकीय वर्तुळातून नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Published by : Siddhi Naringrekar

सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षांचे स्वागत केले जाते. अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीत या नववर्षाचे स्वागत करतात. नववर्षाचे मध्यरात्री जल्लोषात स्वागत करण्यात आले. राजकीय वर्तुळातून देखील नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातील सर्व सदस्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत जयंत पाटील म्हणाले की, २०२४ हे वर्ष आपल्या पक्षासाठी अत्यंत संमिश्र असे वर्ष होते. एकीकडे आपल्या पक्षाचे लोकसभेत सर्वाधिक ८ खासदार निवडून आले तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत मात्र आपल्या अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असे यश आपल्याला मिळाले. अर्थात, या अपयशाची कारणीमिमांसा विविध स्तरांवर चालू आहेच.

आता दिन दुबळ्यांची, पददलितांची, शेतकरी, कामगार व महिलांची लढाई पुन्हा एकदा नव्याने लढण्यासाठी सज्ज होण्याची हि वेळ आहे. सह्याद्री सारख्या कणखर अशा आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या पक्षाचे आपण सर्व कार्यकर्ते आहोत, साहेबांचा कार्यकर्ता हा सदैव लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाही. निवडणुकीत जे अपयश आले ते मागे सोडून आता पुढे जाऊयात. आजही आपल्या पक्षातील एकही पदाधिकारी अथवा कार्यकर्ता जागेवरून हललेला नाही, हेच आपल्या पक्षाचे सर्वात मोठे यश आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र धर्म रक्षणाच्या लढाईसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सज्ज होऊयात ! छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले, शाहू आंबेडकर हा आपल्या पक्षाचा DNA आहे, हे आपण विसरता कामा नये.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, निवडणुकीतील लाट हि केवळ एकदाच येत असते म्हणूनच नव्या वर्षात एक नवीन सुरुवात करूयात. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी आणि महाराष्ट्रातील नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचे आहे.पुन्हा एकदा आपल्याला व आपल्या कुटुंबातील सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या मनःपुर्वक शुभेच्छा ! असे जयंत पाटील म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."