माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी या गावामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर बॅलेटवर मॉक पोल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाने ही निवडणूक होऊ दिली नाही. त्यामुळे या गावात काही काळ संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर राज्यभर या गावाचं नाव पोहोचलं, विरोधी पक्षांनीही हा मुद्दा लावून धरला आणि विधानसभा अधिवेशनात या मुद्दयाचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ न घेत या प्रकरणी निषेध नोंदवला आहे. त्यानंतर आज शरद पवार, जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आज या गावात उपस्थित राहून गावकऱ्यांशी संवाद साधला आहे. यावेळी जयंत पाटील यांनी बॅलेट पेपरवरील अभिरुप मतदान प्रक्रियेला सरकार का घाबरलं? जयंत पाटील यांनी मारकडवाडीतील संघर्षावर भाष्य केले.
जयंत पाटील म्हणाले की, जनतेच्या मनात काय आहे हे लोकांसमोर आलं पाहिजे. विधानसभा निवडणुकीमध्ये पोस्टल मतदानाचा लीड महायुती मला ईव्हीएममध्ये देखील वाढला. आणि विरोधी पक्षाला पोस्टल मतदानात लीड असताना ईव्हीएममध्ये मतदान कमी झाले. इथून पुढे बॅलेट पेपरवर मतदान व्हावे म्हणून अनेक ग्रामपंचायती ठराव करू लागले आहेत.
निवडणूक आयोगाने मतदारांच्या मागणीचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या अशी मागणी जयंत पाटलांनी केली आहे.