स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या सकाळी दहा वाजता गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये मतदारयादी प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन केले होते. या सभेच्यावेळी राज ठाकरेंनी दुपारी 3 वाजता शिवसेना भवनात सर्वपक्षीय विरोधकांची पत्रकार परिषदेची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत, असे लोक उपस्थितीत होते. पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे.
त्यावेळी ते म्हणाले की, "केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांच्याशी चर्चा झाल्यानंतर समाधानकारक उत्तर आले नाही म्हणून हा मोर्चा काढणार आहोत. सत्तेतल्या लोकांनी यात सहभागी झाले तरी काही नाही. लोकशाहीला धक्का पोचवण्याचे काम ज्यांच्या कडून होत आहे त्याच्या विरोधात काढला जाणार आहे. या मोर्चात शरद पवार, शशिकांत शिंदे असतील. आम्ही आक्षेप घेतलेल्या नंतर निवडणूक आयोगाने उत्तर देणे अपेक्षित आहे. अनेक झालेले घोले निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया कधी राभावली हे दाखवावे. सर्व खुलासा निवडणूक आयोगाने केला पाहिजे. लोकशाही बदल ज्यांना आस्था आहे ते उपस्थिती राहतील या पायाला भक्कम करण्यासाठी आव्हान करतो."