ताज्या बातम्या

रामराजे म्हणजे मांडूळाची औलाद; आमदार जयकुमार गोरे यांची घनाघाती टीका

साताऱ्यात उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे घेण्यात आलेल्या MIDC संघर्ष समितीच्या कार्यक्रमात भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर घणाघाती टीका केली.

Published by : Siddhi Naringrekar

प्रशांत जगताप, सातारा

साताऱ्यात उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे घेण्यात आलेल्या MIDC संघर्ष समितीच्या कार्यक्रमात भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर घणाघाती टीका केली. सातारा जिल्ह्यात मुंबई - बेंगलोर औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर पेटताना दिसून येत आहे माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच माण खटावचे आमदार जयकुमार गोरे हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये.

रामराजेंनी एजंट घालून येथे जागा खरेदी करण्याचे काम सुरू केले आहे त्याचप्रमाणे एजंट घातल्यामुळे रामराजेंचे दौरे इकडे सध्या वाढू लागले आहेत मात्र फलटण तालुक्यात एवढे फिरत नाहीत एवढे इकडे फिरायला लागलेत. 1200 एकर जमीन घेण्याकरीता रामराजेंनी 1200 कुटुंबाचं वाटोळ करण्याचा प्लॅन आखला आहे.. जशी गुरं मोकळ्या रानात फिरतात तशी यांना मोकळी वाट झाली आहे अशी टीका खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकरांनी केलीये

माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाषण सुरू होताच आपल्या भाषणाचे टार्गेट रामराजे असल्याचे दर्शवत टीकेला सुरुवात केली ते म्हणाले म्हसवड मध्ये ही अशीच एक संघर्ष समिती स्थापन केली आणि तिथे रामराजे सांगतात की MIDC गेली नाही पाहिजे आणि इथे येऊन सांगतात म्हसवडची MIDC मी इथे आणतो तुम्हाला विकास हवाय का म्हणजे ही मांडूळाची अवलाद आहे असे सांगत सडकून टीका केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी