ताज्या बातम्या

Jio New Plans : युजर्ससाठी Jio चा नवीन 84 दिवसांचा प्लॅन; जाणून घ्या फायदे

रिलायन्स Jio ने असा एक खास प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. जो केवळ 1,029 रुपयांमध्ये तब्बल 84 दिवसांची वैधता आणि अनेक सुविधांसह येतो.

Published by : Team Lokshahi

तुम्ही Jio चे युजर्स असाल आणि दीर्घ वैधता तसेच भरपूर फायदे मिळणारा प्रीपेड प्लॅन शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. रिलायन्स Jio ने असा एक खास प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. जो केवळ 1,029 रुपयांमध्ये तब्बल 84 दिवसांची वैधता आणि अनेक सुविधांसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB हायस्पीड डेटा मिळतो, म्हणजेच एकूण 168GB इंटरनेटचा लाभ घेता येतो. या प्लॅनमध्ये संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि नॅशनल रोमिंगही मोफत दिली जाते. यासोबत दररोज 100SMS पाठवण्याची सुविधाही विनामूल्य आहे.

या प्रीपेड प्लॅनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात अनलिमिटेड 5G डेटाही दिला जात आहे. म्हणजेच, जर तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल आणि तुम्ही Jio च्या 5G नेटवर्कच्या हद्दीत असाल, तर तुम्ही कोणत्याही मर्यादेशिवाय हायस्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. याशिवाय, या प्लॅनमध्ये अॅमेझॉन प्राईम व्हिडिओचं मोफत सब्स्क्रिप्शनही दिलं जातं. ज्यामुळे तुम्ही पेड वेबसिरीज, चित्रपट आणि शोज पाहू शकता. या शिवाय, JioTV, JioCinema आणि JioCloud सारख्या सेवांचाही अॅक्सेस मोफत मिळतो.

यासोबतच Jio चा आणखी एक प्लॅन 1,028 रुपयांमध्ये उपलब्ध आहे जो 84 दिवसांचीच वैधता देतो आणि इतर फायदेही जवळजवळ तितकेच आहेत. यातही दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100SMS प्रति दिवस आणि अनलिमिटेड 5G अॅक्सेस दिला जातो. मात्र, यामध्ये OTT फायदे वेगळे आहेत. या प्लॅनमध्ये अॅमेझॉन प्राइम ऐवजी स्विगीचे प्रीमियम सब्स्क्रिप्शन मिळते. त्यामुळे जर तुम्ही OTT कंटेंटपेक्षा फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सचा अधिक वापर करत असाल, तर स्विगी सब्स्क्रिप्शन असलेला हा प्लॅन तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो.

दोन्ही प्लॅन्सच्या मूळ सुविधांमध्ये कोणताही फरक नाही. वैधता, डेटा आणि कॉलिंग सर्व काही सारखेच आहे. फरक केवळ OTT फायदे यामध्ये आहे. जर तुम्ही चित्रपट, शोज आणि वेबसिरीज बघण्याचे चाहते असाल, तर 1,029 रुपयांचा अ‍ॅमेझॉन प्राईम प्लॅन तुमच्यासाठी अधिक चांगला पर्याय आहे. दुसरीकडे, जर तुम्ही फूडी असाल आणि स्विगीचा वापर नियमित करत असाल, तर 1,028 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठीच तयार आहे, असं म्हणायला हरकत नाही.

या व्यतिरिक्त, कमी बजेटमध्ये डेटा वापरणाऱ्यांसाठी रिलायन्स Jio चा 189 रुपयांचा प्लॅनसुद्धा एक चांगला पर्याय आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 2GB हायस्पीड डेटा मिळतो. जे एअरटेलच्या समान किमतीच्या प्लॅनपेक्षा दुप्पट आहे. याशिवाय, Jio या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधताही देते, जी एअरटेलच्या प्लॅनच्या तुलनेत एका आठवड्याने जास्त आहे. त्यामुळे Jio चा 189 रुपयांचा प्लॅनदेखील अल्प वापरासाठी उपयुक्त आणि फायदेशीर आहे.

एकंदर पाहता, Jio चे हे प्रीपेड प्लॅन्स विविध वापरकर्त्यांच्या गरजांनुसार तयार करण्यात आले असून OTT प्रेमी आणि फूडी युजर्स दोघांसाठीही योग्य पर्याय उपलब्ध करून देतात. तुमच्या वापराच्या सवयी आणि गरजा ओळखून प्लॅन निवडल्यास निश्चितच अधिक लाभ होऊ शकतो.

हेही वाचा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ind vs Eng 3rd Test Match : इंग्लंडनं 22 धावांनी सामना जिंकला; जडेजा-सिराजची झुंज अपयशी, इंग्लंड संघ 2-1 नं आघाडीवर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना भारताने गमावला; इंग्लंड 22 धावांनी जिंकली

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या व्हिडिओ काढण्यासंबंधीत 'त्या' विधानामुळे वादंग; मिश्रा, शर्मा, राय या वकिलांची महासंचालकांकडे तक्रार

Ind Vs Eng 3rd Test Match : भारतीय संघ अडचणीत; मध्यांनापर्यंत 8 गडी बाद, रवींद्र जडेजावर मोठी जबाबदारी