अमित शाह यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक वक्तव्य केल होत. ज्यामुळे आता राजकीयवर्तुळात पडसाद उमटताना पहायला मिळत आहेत. संसदेतील अमित शाहांच्या भाषणाचा व्हिडियो कॉंग्रेसनं ट्विट केला आहे. या व्हिडियोवरून कॉंग्रेस आणि भाजपमध्ये खडाजंगी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
या व्हिडियोमध्ये अमित शाह म्हणाले होते की, 'आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल.' यामुळे राजकीयवर्तुळात अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत.
आम्ही आंबेडकरांना विसरणार नाही...- जितेंद्र आव्हाड
याचपार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड संताप व्यक्त करत म्हणाले की, 'आंबेडकर हे फॅशन नाही पॅशन आहेत' हे नाव विसरलो तर भविष्यात लोक आम्हाला कृतज्ञ म्हणतील.... ज्या माणसाने आम्हाला नरकातून बाहेर काढलं आणि माणूस म्हणून जगायला शिकवलं त्याच नाव भिमराव रामजी आंबेडकर म्हणजेच आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर.... आणि आम्ही हेच म्हणत राहणार. तुम्ही आम्हाला कितीही ते विसरायला लावा, आम्ही आंबेडकरांना विसरणार नाही.
ते फॅशन नाही आमचं पॅशन आहेत- जितेंद्र आव्हाड
पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, म्हणून मी म्हणतो जय भीम हा कोणत्या जातीचा नारा नाही, तर तो आमच्यातला ऊर्जा स्त्रोत आहे.... कुठल्याही अत्याचारा विरुद्ध, कुठल्याही हिंसाचारा विरुद्ध किंवा कुठल्याही अन्यायाविरुद्ध आम्हाला प्रसथतापितांविरुद्ध लढण्याची ताकद देणारा कोण? तर तो आमचा भिम... त्यामुळे तुम्ही किती ही बोला हे काय नवीन फॅशन आहे, ते फॅशन नाही आमचं पॅशन आहेत.. असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केला.