आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची गुप्त भेट घेतली आहे. आजारी असल्याने धनंजय मुंडेंच्या भेटीला गेल्याचं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं आहे. त्याचसोबत ही भेट त्यांच्या निवासस्थानी झाली असून ती विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचं देखील सुरेश धस म्हणाले आहेत. भेट घेणे ही वेगळी गोष्ट आणि लढा वेगळा आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तो पर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.
त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये समेट झालाय का? याची चर्चा देखील सुरु झाली आहे. तसेच यावर चंदशेखर बावकुळे यांनी एक मोठा खुलासा केला. ही भेट त्यांनीच घडवून आणल्याचं बावनकुळे म्हणाले. त्याचसोबत त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाही, असं देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस आणि मुंडे यांच्या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अचानकपणे यु टर्न का मारलाय? - जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, साडेचार तास भेट झाली चार दिवसापूर्वी भेट झाली. लपून भेटले हे बोलन मला तरी योग्य वाटत नाही. डिसेंबर महिन्यापासून धस धनंजय मुंडेंवर तोफा टाकत होते, आणि आता अचानक म्हणतात मी राजीनामा मागितला नाही. आम्हाला कमी ऐकू येतं. हे सर्व प्रकरण उघडकीस कसं आलं, तर बावनकुळे यांनी सांगितलं हे दोघे भेटले आणि मी होतो. धस साहेब अतिशय समाजशील झाले आहेत. त्यांनी धनंजय मुंडेंना देखील माफ करून टाकलं आहे. एवढ्या प्रामाणिकपणे हा माणूस काम करत होता, अचानकपणे यु टर्न का मारलाय? हे काय कळायला मार्ग नाही. साडेचार तास भेटले असतील, तर त्यांनी मराठीत एक गाणं म्हटले असेल, 'तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्याचा माळा'. महाराष्ट्राने जे दोन महिने बघितलं ते सर्व महाराष्ट्राने विसरून जायचं. प्रेम व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी बाहेर पडलं रोज डे च्या दिवशी पुष्पगुच्छ देऊन भेटले असतील, आज बाहेर पडला सगळे डे साजरे केले असतील त्यांनी असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
अजित पवारांवर बोलताना जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एखादा विषय हातात घेतल्यावर तो तडीस नेणे हा स्वभाव गुण समजू शकतो, पण तो सोडून देणे हे दुर्गुण असतं. बीडच्या राजकारणात दोघांचा सख्याच होतं. पुढे आकावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आका हा आका आहे अजूनही अजितदादा म्हणत आहेत राजीनामा घेणार नाही. एग्रीकल्चरचा घोटाळा बाहेर आला, हार्वेस्टरचा घोटाळा बाहेर आला, दहा रुपयाची वस्तू पन्नास रुपयाला घेतल्याचा घोटाळा बाहेर आला, तो घोडाळा एकनाथ शिंदेंवर टाकून मोकळे झाले. एकनाथ शिंदे यांना काय माहिती नसताना देखील त्यांना त्या प्रकरणात ओढून घेतला. आज अजितदादा म्हणाले राजीनामा घेणार नाही, तुम्हाला कोण सांगत आहे राजीनामा घ्यायला, राजीनामा घ्यायचा असेल तर माननीय मुख्यमंत्री घेतील. विरोधी पक्षाची ठाम भूमिका आहे आम्ही राजीनामा घेणारच, असा थेट इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला आहे तसेच त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुम्ही शेतकऱ्यांना फसवणार, तुम्ही कृषी खात्यात भ्रष्टाचार करणार, हार्वेस्टर संदर्भात वाल्मीक कराड तुमचे पैसे जमा करणार, तुमच्या बंगल्यामध्ये मीटिंग होणार... तो वाल्मीक कराड म्हणणार तो माझा माणूस आणि तो तिथे मर्डर करणार... गुन्हा नोंदवला जातो तो तुमचा खास माणूस, जो स्टेटस ठेवतो तुमच्याबद्दल चांगलं बोलतो... पोलीस त्याचा नावही घेत नाही पुण्यामध्ये यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे. म्हणून आम्ही म्हणतो की, राजीनामा घ्यायला पाहिजे.