अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत म्हटले की, अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत.
मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे.
यावर प्रतिक्रिया देत जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्विटवर परत ट्विट करत म्हटले आहे की, म्हणजे हा भ्रष्टाचार मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने झाला आहे का ? काय म्हणायचे आहे मुंडेंना…असे आव्हाडांनी म्हटले आहे.