परभणी प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सरकारला सवाल विचारला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महिना झाला परभणी प्रकरण मध्ये काय झालं? एकाही पोलिसांवर साधा गुन्हा देखील दाखल नाही.
मी पुन्हा एकदा सांगतो की हा इन्स्टिट्युशनल मर्डर आहे. हा प्रश्न फक्त ह्याच केस संदर्भात नाहीये. रोज पोलीस असंख्य लोकांना वेगवेगळ्या कारणांनी अटक करत असतात जर हे सर्रास सुरू झाले तर तुम्हा आम्हाला कोणी वाली राहणार नाही. अरे आवाज दो......जय भीम जय भीम असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.