Jitendra Awhad : "विधिमंडळात गुंडांना प्रवेश का देता?" जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल Jitendra Awhad : "विधिमंडळात गुंडांना प्रवेश का देता?" जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल
ताज्या बातम्या

Jitendra Awhad : "विधिमंडळात गुंडांना प्रवेश का देता?" जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल

जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल: विधिमंडळात गुंडांना प्रवेश का देता?

Published by : Riddhi Vanne

दोन दिवसापासून दोन्ही नेत्यांमध्ये चिडवाचिडवी सुरु होती. त्यानंतर आज विधीमंडळ परिसरात दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. याचपार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली आणि माध्यामांशी संवाद साधला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, "हल्ला कोणी केला? आम्हाला प्रश्न विचारू नका!" ,जितेंद्र आव्हाड यांचा विधानसभेत भावनिक उद्गार, पत्रकार परिषदेतही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत विधिमंडळातच फ्री स्टाईल हाणामारी; आव्हाड यांनी गंभीर आरोप करत पत्रकार परिषदेत म्हणाले की, "हल्ला कोणी केला? सांगा ना, जोरात सांगा! आम्हाला प्रश्न विचारू नका. जर तुमच्यात बोलण्याची हिम्मत नसेल, तर आम्हाला प्रश्न कशाला विचारता? जर या सभागृहात तुम्ही गुंडांना घेऊन येणार असाल आणि आमच्यावर हल्ला करणार असाल, तर आम्ही सुरक्षित कुठे आहोत? मी स्वतः ट्विटरवर लिहिलंय , मला आई-बहिणीवर शिव्या देण्यात आल्या आणि मला ठार मारण्याची धमकीही दिली गेली आहे."

ते पुढे म्हणाले, "बस्स झालं! अख्ख्या महाराष्ट्राला समजलंय कोणी हल्ला केला ते. आम्हाला त्यापेक्षा अधिक पुरावे द्यायचं काही उरलेलं नाही. राज्य सरकारनं जर यावर भूमिका घेतली नाही, तर उद्या हा सभागृह सुरक्षित राहणार नाही. हल्लेखोर कोण? आणि त्यांच्यावर कारवाई कधी होणार?". जितेंद्र आव्हाडांच्या या थेट भूमिकेने राज्यातील सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढला असून, सोशल मीडियावरही 'हल्ला कोणी केला?' या प्रश्नावरून प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकऱ्यांनी व्हिडीओ क्लिप्स शेअर करत संबंधित प्रकरणाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sangli : सांगलीत एकाच कुटुंबातील चौघांनी केले विषप्राशन;सासू-सुनेचा मृत्यू, बाप-लेकाची प्रकृती गंभीर

Latest Marathi News Update live : उद्धव ठाकरेंची आज मुलाखत

Raj Thackeray : 'तू आम्हाला पटक पटके मारणार? दुबेला मी सांगतो, दुबे ...';राज ठाकरेंचं निशिकांत दुबेंना खुलं आव्हान

Latest Marathi News Update live : राज ठाकरे यांचं निशिकांत दुबेला खुलं चॅलेंज