JNU Non Veg Controversy  Team Lokshahi
ताज्या बातम्या

JNU मध्ये रामनवमीच्या दिवशी वाद! ABVP अन् डाव्या विद्यार्थ्यांमध्ये नॉन व्हेजवरुन संघर्ष

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात यावरुन तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Sudhir Kakde

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) आज डाव्या विचाराच्या विद्यार्थ्यांचा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष झाल्याची माहिती समोर आली आहे. डाव्या विचारसरणीच्या (Leftist) विद्यार्थ्यांनी आरोप केलाय की, एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना मांसाहारी जेवण करण्यापासून रोखलं आहे. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी कावेरी वस्तीगृहाच्या मेस सेक्रेटरीला देखील मारहाण केल्याचा आरोप डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. (JNU Non Veg Controversy)

जेएनयू कॅम्पसमध्ये एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांवर गुंडगिरीचा आरोप करणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी इतर सहकाऱ्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय. तर दुसरीकडे, डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी कावेरी वस्तीगृहात रामनवमीच्या पूजेला परवानगी देत ​​नसल्याचा आरोप अभाविपने केला आहे. सध्या जेएनयू कॅम्पसमध्ये या प्रकरणावरून गोंधळ सुरू आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा