Journalist Suresh Kaulgekar Team Lokshahi
ताज्या बातम्या

बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दर्पण पुरस्कार पत्रकार सुरेश कौलगेकर यांना घोषित

पत्रकारितेतील सर्वोच्च असा राज्यस्तरीय सन २०२२ चा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या स्मरणार्थ  राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार पत्रकार सुरेश कौलगेकर यांना घोषित

Published by : shweta walge

प्रसाद पाताडे, सिंधुदुर्ग: पत्रकारितेतील सर्वोच्च असा राज्यस्तरीय सन २०२२ चा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार पत्रकार सुरेश कौलगेकर याना घोषित झाला आहे. या पुरस्काराचे वितरण मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या देवगड पोभूर्ले येथील जन्मगावी शुक्रवार ६ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे.

मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधींच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन २०२२च्या राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

मराठी  वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या १७६व्या पुण्यतिथी दिनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधींच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा केली होती या महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील उत्तर महाराष्ट्र , कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा विभागातून निवडक आठ पत्रकारांना राज्यस्तरीय दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार जाहीर झाले होते. या पुरस्काराचे वितरण ६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता देवगड पॉभुलें येथे आयोजित केले आहे.

सुरेश कौलगेकर यांनी कोकण सारख्या ग्रामीण भागातील अनेक सामाजिक विषयांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला अनेक दुर्लक्षित घटकाना समाजात स्थान व त्याच्या प्रश्नांनाना व्यासपीठ देण्याचे कार्य केले समाजीकतेबरोबरच क्रीडा, शिक्षण, साहित्य, पर्यटन, कृषी, क्राईम विषयक घटना यांना पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय दिला या त्याच्या सर्वांगीण कार्याबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार जाहीर झाला आहे. आज पर्यत त्यांना राज्यस्तरीय आमदार गुरुनाथ कुलकर्णी स्मृती राज्यस्तरीय गुरुकुल पुरस्कार २०१२, वेताळ प्रतिष्ठान तर्फे २०१७ चा राज्यस्तरिय आदर्श पत्रकार पुरस्कार त्याच बरोबर तालुका, जिल्ह्यास्तरावरील विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान मूल्याकन समिती, महात्मा गांधी तंटामुक्त समिती, शासनाची राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी समिती, प्रजापीता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मीडिया विंभाग सदस्य, मुबई आंबा महोत्सव प्रसिद्धी विभाग समिती, महाराष्ट्राचा सुवर्णी महोत्सव समिती सदस्य, वेंगुर्ला तालुका क्रीडा समन्वय समिती, यशवतराव चव्हाण प्रतिष्ठान समिती, अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआदोलन समिती यासह अन्य समितीवर यशस्वी कार्य केले आहे. महाराष्ट्र राज्य श्रमिक पत्रकार संघ याच्या माध्यमातून सिंधुदूर्ग जिल्ह्या श्रमिक पत्रकार संघ अध्यक्ष म्हणून जिल्ह्यातील पत्रकार यांना विशेष सोयी सवलतीचा लाभ मिळवून दिला आहे व कार्य अविरत सुरू आहे.

आज पर्यंत त्यांनी दैनिक रत्नागिरी एक्स्प्रेस, दैनिक पुढारी, दैनिक मुबई  महानगर, दैनिक मुबई संध्याकाळ, दैनिक मुबई नवाकाळ, दैनिक मुबई लक्षदीप, दैनिक कोकणसाद, दैनिक सागर,दैनिक गोवादूत , दैनिक पुण्यनगरी ,  दैनिक सिंधुदूर्ग समाचार,  दैनिक रत्नागिरी टाईम्स ,दैनिक रणझुझार,  ,दैनिक नवशक्ती, दैनिक  नवप्रभा गोवा यामधून लिखाण सुरू केले आहे काळाच्या बदलणाऱ्या पत्रकारितेच्या अनुषंगाने केवळ प्रिंट मीडिया करतानाच इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे ते सध्या अग्रगण्य मराठी वृत्तवाहिनी जय महाराष्ट्र चॅनेल मधून सिंधुदूर्ग प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत . पत्रकारितेत जवळ जवळ वीस वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत आहेत.त्यामुळे या त्याचा एकूण कामाची दखल घेत पत्रकारितेतील सर्वोच्च असा राज्यस्तरीय सन २०२२ चा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या स्मरणार्थ  राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार जाहीर झाला. त्या पुरस्काराचे वितरण ६ जानेवारी रोजी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या जन्मदिनी समारंभ पूर्वक वितरण केले जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधींचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी दिली. पत्रकार सुरेश कौलगेकर याना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा