Team Lokshahi
ताज्या बातम्या

जेएसडब्लू कोकणात करणार सुमारे ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक-उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

जेएसडब्लू कंपनी कोकणामध्ये सुमारे ४ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Published by : Team Lokshahi

जेएसडब्लू कंपनी कोकणामध्ये सुमारे ४ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. आज पेण ( रायगड ) येथील जेएसडब्लू निओ एनर्जी प्रकल्पाच्या सामंजस्य करारासंदर्भात आयोजित मंत्रालयातील बैठकीत मंत्री सामंत बोलत होते. जेएसडब्लूच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून थेट सुमारे ४५० तरूणांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे रोजगार निर्माण होणार आहे. तरुणांना जास्तीत - जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभाग काम करीत असल्याचे सामंत यांनी सांगितले.

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यामध्ये ७५ हजार तरूणांना रोजगार देण्याचा मानस राज्य सरकारचा असून त्याअनुषंगाने उद्योग विभाग कार्य करत असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी.अनबलगन व सर्व संबंधित उपस्थित होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Janasuraksha Bill : महाराष्ट्रात 'जनसुरक्षा विधेयक' मंजूर ; नक्षलवाद्यांविरोधात होणार कठोर कारवाई

Pakistan News : ओळख विचारुन पंजाबमधील 9 जणांवर झाडल्या गोळ्या ; धक्कादायक प्रकार समोर

Gold Rate : सोन्याच्या दरात 27% वाढ ; गुंतवणूकदारांना लाभ, मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री

Ganpatipule Temple : गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू होणार