पश्चिम रेल्वेवर शुक्रवार आणि शनिवारच्या दरम्यान पुन्हा एकदा रात्रीचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकदरम्यान पश्चिम रेल्वेच्या ३३४ लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीतही मोठा बदल होणार आहे. माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेच्या सर्व प्रवाशांना शुक्रवार, शनिवार आणि रविवारी दरम्यान लोकलने प्रवास करताना अडचण येण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी रात्री 11 एप्रिलला पहिला मेगा ब्लॉकच्या वेळेस अप-डाउन स्लो लोकल रात्री 11 ते सकाळी 8:30 असतील तर अप-डाउन फास्ट लोकल रात्री 12:30 ते सकाळी 6:30 वाजेपर्यंत असण्याची शक्यता आहे. तसेच
शुक्रवारी रात्री 10:23 नंतर चर्चगेट स्थानकातून सुटणाऱ्या सर्व स्लो लोकल आणि चर्चगेटच्या दिशेला येणाऱ्या अप स्लो लोकल मुंबई सेंट्रल-सांताक्रुझ दरम्यान जलद मार्गावरुन धावणार .परिणामी महालक्ष्मी, लोअर परेल, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकात थांबणार नाहीत. ब्लॉक दरम्यान चर्चगेट ते दादर दरम्यान लोकल जलद मार्गावरुन धावणार. ब्लॉक कालावधीत गोरेगांव - बांद्रा दरम्यान लोकल हार्बर मार्गावरुन चालविण्यात येणार. विरार -अंधेरी दरम्यान लोकल धिम्या-जलद मार्गावरुन धावणार.
शनिवारी सकाळी 6:10 वाजता भाईंदर स्थानकातून पहिली चर्चगेट लोकल रवाना होणार. ही लोकल सांताक्रुझ ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरुन धावणार. शनिवार बोरीवली -चर्चगेट दरम्यान पहिली धीमी लोकल सकाळी 8:03 वाजता सुटणार. चर्चगेट स्थानकातून पहिली जलद लोकल सकाळी 6:14 वाजता बोरीवलीकरिता सुटणार. चर्चगेट - विरार पहिली जलद लोकल सकाळी सव्वा सहा वाजता धावणार. चर्चगेट -बोरीवली दरम्यान पहिली धीमी लोकल सकाळी 8:03 वाजता सुटणार.
शनिवार रात्री 12 एप्रिलला दुसऱ्या मेगा ब्लॉकच्या वेळेस अप-डाउन स्लो लोकल रात्री 11:30 ते सकाळी 9 असतील तर अप-डाउन फास्ट लोकल रात्री 11:30 ते सकाळी 8 वाजेपर्यंत असण्याची शक्यता आहे.
ब्लॉक दरम्यान चर्चगेट - दादर दरम्यान जलद लोकल धावणार
शनिवार रात्री/रविवार सकाळी डहाणू रोड, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईदर बोरीवली हून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यत धावणार
चर्चगेट - विरार शेवटची लोकल रात्री १०.५३ वाजता
रविवारी विरार - चर्चगेट पहिली पहली धीमी लोकल सकाळी ८.०८ वाजता
रविवारी भाईदर - चर्चगेट पहिली लोकल सकाळी ८.२४ वाजता
विरार - चर्चगेट पहिली जलद लोकल सकाळी ८.१८ वाजता
चर्चगेट- विरार पहिली जलद लोकल सकाळी ९.०३ वाजता