ताज्या बातम्या

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड होणार देशाचे 50 वे सरन्यायाधीश; आज घेणार शपथ

Published by : Siddhi Naringrekar

न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड हे आज देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला असून त्यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सुमारे सात वर्षे आणि चार महिने मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले, सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील CJI चा त्यांचा सर्वात मोठा कार्यकाळ होता.

22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 पर्यंत ते सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी राष्ट्रीय राजधानीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात BA ऑनर्स केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून एलएलबी केले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूल, यूएसए मधून LLM आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवली आहे.

राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ देतील. न्यायमूर्ती चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत दोन वर्षांसाठी या पदावर असतील. न्यायमूर्ती चंद्रचूड यांना जून 1998 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते आणि त्याच वर्षी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ते न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची जागा घेतील.

"माझ्या पाठीत नाही, मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केला"; उद्धव ठाकरेंची PM मोदींवर घणाघाती टीका

महाविकास आघाडीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही - एकनाथ शिंदे

Alia Bhatt MET GALA Look 2024: 'मेट गाला २०२४'मध्ये आलियाने केला 'हा' खास लूक, पाहा फोटो...

Daily Horoscope 09 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या जीवनात घडणार महत्त्वाचे बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 09 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना