हरियाणामधील पोलिसांनी अलीकडेच ज्योती मल्होत्रा या तरुण युट्यूबरला अटक केली असून, तिच्याकडून सध्या सखोल चौकशी सुरु होती. ती पाकिस्तानसाठी हेरगिरीच काम करत असल्याचा गंभीर आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. प्राथमिक तपासामध्ये असे समोर आले आहे की तिने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांशी संबंध ठेवून भारतीय लष्करासंबंधित गोपनीय माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. आता ज्योती मल्होत्राला हिसार न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पाच दिवस त्यानंतर 4 दिवसीय न्यायालयीन कोठडी सुनावली होती.