Exam  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Lokshahi Impact : औरंगाबादच्या काब्रा महाविद्यालयाचा परवाना रद्द

एका बाकावर तीन विद्यार्थी बसवून सुरु होत्या परीक्षा.

Published by : Sudhir Kakde

औरंगाबाद | सचिन बडे : च्या काब्रा महाविद्यालयामध्ये (Kabra College) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या महाविद्यालयातली परीक्षा पाहून अनेक उपस्थित होत आहेत. महाविद्यालयात निर्माण झालेलं चित्र पाहिल्यानंतर ही रीक्षा आहे की परीक्षा असा प्रश्न तुम्हाला पडेल. पदवीच्या परीक्षेसाठी एका बेंचवर तब्बल तीन विद्यार्थी बसवण्यात आले. या प्रकरणाची बातमी लोकशाहीने दिल्यानंतर आता याचा इम्पॅक्ट झाला असून, महाविद्यालयावर कारवाई करण्यात आली आहे.

परीक्षा केंद्रावरील हा भोंगळ कारभार लोकशाही न्युजने समोर आणला होता. यानंतर शिक्षण विभाग सुद्धा खडबडून जागा झाला आणि महाविद्यालयाचं परीक्षा केंद्र रद्द केला आहे. परीक्षेच्या काळात काब्रा महाविद्यालयातील ही परीस्थिती थक्क करणारी होती. एका बाकावर तीन विद्यार्थी बसल्यानंतर काही विद्यार्थ्यांना याचा त्रास झाला त्यामुळे ही परिस्थिती समोर आली. हा प्रकार समोर आल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने मात्र आपल्याला या प्रकरणानंतर हात वर केल्याचं पाहायला मिळालं. मात्र शिक्षण विभागाने याबद्दल गंभीर पवित्रा घेतला असून, बी. ए. आणि बी. कॉमचं हे परीक्षा केंद्र रद्द केलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा