थोडक्यात
साताऱ्यातील कोरेगावामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका 27 वर्षीय तरुणाने चक्क 7 बाळांना जन्म दिला आहे.
नेमकं काय प्रकरण आहे, नक्की ही बातमी वाचा.
साताऱ्यातून एक धक्कादायक आश्चर्याची बातमी समोर आली आहे. गुजरातील मुळ राहिवासी असणाऱ्या 27 वर्षीय काजल विकास खाकुर्डिया हिने एकावेळी 4 बाळाला जन्म दिला आहे. माहेरी बाळतंपणासाठी काजल साताऱ्यातील कोरेगाव येथे आली. यामध्ये तीन मुली आणि एका मुलगा असा समावेश आहे.
याआधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलने तीन जुळ्या बाळांना जन्म दिला होता. गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवडमध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळाचं अधिवास खुलणार आहे.अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळ ठणठणीत आहेत.
या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉ. देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने मेहनत घेतली. एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकप्रकारे आनंदसोहळाच पाहायला मिळाला.