ताज्या बातम्या

कळसुबाई शिखर आणि भंडारदरा धरण परीसरात नवीन वर्षासाठी प्रशासन सज्ज

निसर्ग भंडारदरा सज्ज पंढरी म्हणुन आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झालेल्या भंडारदरा पर्यटन क्षेत्र व कळसुबाई पर्वत शिखर परिसरामध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आदेश वाकळे, संगमनेर

निसर्ग भंडारदरा सज्ज पंढरी म्हणुन आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झालेल्या भंडारदरा पर्यटन क्षेत्र व कळसुबाई पर्वत शिखर परिसरामध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे. भंडारदरा धरणाचा जलाशय व माळरानावर विद्युतरोषणाईसह विविध रंगी बेरंगी कापडी तंबुंची कमान उभी राहिली आहे.अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील भंडारदरा धरण हे निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यातील वर्षाऋतू म्हणजे निसर्गाचा खास अविष्कार पर्यटकांसाठी अविस्मरणीय असतो डिसेंबरमध्ये सुट्टीचे औचित् भंडारदऱ्याच्या निसर्गात दाखल होऊ लागले आहेत. या पर्यटकांच्या स्वागतासाठी भंडारदऱ्यातील टेन्टधारक हॉटेल व्यावसायिक निरनिराळे फंडे वापरत पर्यटकांना आकर्षित करत आहेत.

धरणाच्या जलाशयाच्या कडेला टेन्ट उभारले जात असून इच्छुक टेन्टमध्ये राहण्यास असणाऱ्या पर्यटकांना व्यवस्थित सुविधा उपलब्ध होत असल्याने टेन्टला प्रतिसाद देत असले तरी अनेक पर्यटक हॉटेल्समध्ये मुक्कामी राहून भंडारदऱ्याच्या निसर्गाचाही मनमुराद आनंद लुटत आहेत.अनेक टेन्टधारक व हॉटेलधारक पर्यटकांना नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागताचे औचित्य टेन्टच्या दरामध्ये विशेष सवलत देत आहेत. तर पर्यटकांना विशेष पॅकेजमध्ये हॉटेल्सधारकांनी विशेष सवलत दिली आहे.

अनेक हॉटेल्सवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.शनिवारी व रविवारी तर कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असल्याने नवीन वर्षासाठी शिखरावर जाण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती दिसत आहे.अलंग-कुलंग-मलंग या गडकिल्ल्यांवरही साहसी पर्यटक नववर्षांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात हजर होणार आहेत. भंडारदरा धरणाच्या पर्यटन क्षेत्रामध्ये भंडारदरा धरण, सांदणदरी, अमृतेश्वर मंदिर, भंडारदरा धरणातील बोटींगही पर्यटकांचे असणार आहे. राजूर पोलीस स्टेशन चे वतीने पोलिस निरीक्षक गणेश इंगळे यांचे मार्गदर्शन खाली चोख बंदोबस्त ठेवणेत आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?