Chainnatures | Kalyan Police  team lokshahi
ताज्या बातम्या

चेन स्नेचरने धूम स्टाईलने महिलेचे मंगळसूत्र आणि चैन केली लंपास

घटना सीसीटिव्हीत कैद

Published by : Shubham Tate

कल्याण (अमजद खान) : मॉर्निंग वॉक करत असताना एका महिलेला धक्का देत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व चैन खेचून दोन तरुणांनी धूम स्टाईलने पळ काढल्याची घटना ठाकुर्ली ९० फिट रोड वर घडली. ही घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. (Kalyan chain snecher dhoom style women's mangalsutra and chain kelly lampas)

कल्याण डोंबिवली जोडणाऱ्या ठाकुर्ली समांतर रस्त्यावर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी नागरिकांची गर्दी असते. हीच संधी चेन स्नेचर साधत आहेत. आज सकाळी याच परिसरात राहणारी महिला या रस्त्यावर मॉर्निंग वॉक करत होती. याच दरम्यान दोन तरुण दुचाकीवर महीलेच्या मागावर होते. याच दरम्यान या मधील एक तरुण खाली उतरला त्याने महिलेच्या गळ्यातील मंगलसूत्र व चैन हिसकावली व त्यानंतर दोन्ही तरुणांनी बाईक वर धूम ठोकली. ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेरे कैद झाली आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा