कल्याणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दोन नराधमांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असून तिची निर्घृण हत्या केली आहे.
कल्याणच्या बापगाव परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून ही चिमुकली दुकानातून खाऊ आणण्यासाठी पैसे घेऊन बाहेर गेली होती, परंतु ती घरी परत आलीच नाही. आठ ते नऊ तासांनी तिच्या कुटुंबाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानंतर पोलिसांना बापगाव परिसरात या चिमुकलीचा मृतदेह सापडला. या प्रकरणात हत्येप्रकरणी दोन आरोपींचे नावे समोर आली असून यातील रिक्षा चालक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. तर मुख्य आरोपी विशाल गवळीचा पोलीस शोध घेत होते.
याच पार्श्वभूमीवर आता मुख्य आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून शेंगाववरुन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.