Kalyan Dombivli Municipal Corporation Elections Kalyan Dombivli Municipal Corporation Elections
ताज्या बातम्या

Kalyan Dombivli Municipal Corporation Elections : ठाकरे गट–मनसे युतीचा फॉर्म्युला अखेर ठरला! 122 जागांपैकी..

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत युती जाहीर...

Published by : Riddhi Vanne

 MNS and the Shiv Sena Thackeray faction : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत युती जाहीर केली असून मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) महापालिका निवडणुका एकत्र लढवणार आहेत.

कल्याण–डोंबिवली महापालिकेसाठी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप निश्चित झाले आहे. एकूण 122 जागांपैकी मनसे 54 जागांवर तर ठाकरे गट 68 जागांवर उमेदवार देणार आहे. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे नेत्यांनी सांगितले. दोन्ही पक्षांतील चर्चा शांततेत पूर्ण झाल्या असून कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आहे. मनसेने मागणी केलेल्या काही जागा ठाकरे गटाने सोडल्या, तर काही जागांवर मनसेनेही माघार घेतली. कल्याण पश्चिम भागात मनसेचे उमेदवार अधिक असतील, उर्वरित भागात ठाकरे गट लढणार आहे.

सध्या इतर पक्षांशी कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसली तरी भविष्यात संवादासाठी दारे उघडी ठेवण्यात आली आहेत. दोन्ही पक्षांनी आता जोरात तयारी सुरू केली असून कल्याण–डोंबिवलीतील निवडणूक यावेळी चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा