Kareena Kapoor Team Lokshahi
ताज्या बातम्या

माता सीतासोबत स्वत:ची तुलना केल्याने करिना कपूर ट्रोल

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात करीना हिने स्वतःची तुलना माता सीता यांच्यासोबत केली आहे. ज्यामुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

Published by : Team Lokshahi

अभिनेत्री करीना कपूरने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. करीना कपूर ही रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात करीना हिच्यासोबत अजय देवगन, दीपिका पादुकोण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहते या सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, सध्या करीनाला ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. सध्या करीना कपूर हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये करीना कपूर माता सीता यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘माता सीता यांच्या शिवाय रामायण पूर्ण होऊ शकत नाही, त्याच प्रमाणे करीना कपूर शिवाय रोहित शेट्टी याचा सिनेमा पूर्ण होऊ शकत नाही…’ सध्या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

करीना कपूरचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्याने म्हटले की, ‘कमाल उदाहरण आहे, आजपर्यंत हे ऐकलं नाही…’, दुसरा नेटकरी म्हणाली, ‘ही काय वायफळ बडबड करत आहे…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘स्वतःची तुलना देवासोबत करत आहे…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘हे रोहित यानेच शिकवलं असेल…’, सध्या सर्वत्र करीना हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

करीना कपूरचा व्हायरल व्हिडिओमुळे तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागला. व्हिडिओ पाहा-

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा