महाराष्ट्रात मराठी भाषेची आणि मराठी माणसाची कोणत्या न कोणत्या कारणाने गळचेपी होताना पाहायला मिळत आहे. अस असताना आता कोल्हापूर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद वाढताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाला कर्नाटकात कन्नड येत नाही म्हणून कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी महाराष्ट्र एसटी बसला आणि बस चालकाला काळे फासल्याच्या घटनेची पडसाद महाराष्ट्रात उमटण्यास सुरुवात झाली आहे.
हे लक्षात घेऊन कर्नाटकातून महाराष्ट्राकडे जाणारी बस सेवा थांबवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सकाळपासून महाराष्ट्रातून एकही बस बेळगावकडे आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो आहे. यामुळे सीमा भागातील मराठी लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई बंगळुरू बसवर कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला केला.
यानंतर बस चालकाला एसटी बसमधून खाली ओढून "कर्नाटकात यायचं असेल तर कन्नड बोलायलाच हवं" असं म्हणत कार्यकर्त्यांनी एसटी बसला आणि चालकाच्या तोंडाला काळे फासले. या घटनेनंतर आता महाराष्ट्र -कर्नाटक आंतरराज्य बस सेवेवर परिणाम होताना पाहायला मिळत आहे. काही काळासाठी महाराष्ट्र-कर्नाटक दोन्ही राज्याच्या आंतरराज्य बस सेवेवा बंद राहणार आहेत. सकाळपासून महाराष्ट्रातून एकही बस बेळगावकडे गेली नाही तसेच कर्नाटक आणि कोल्हापुरातील आंदोलनामुळे खबरदारी घेण्यात आली आहे.