कर्नाटकच्या मुख्यामंत्रांच्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर येत आहे. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात सिद्धरामय्या यांच्याशी संबंधित 92 स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. सिद्धरामय्या यांनी राजकीय प्रभावाचा वापर करून घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना एडी चा दणका मिळाला आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या बंगळुरू येथील विभागीय कार्यालयाने एकूण 92 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.ही मालमत्ता साधारण १०० कोटी रुपयांची आहे. ही मालमत्ता गृहनिर्माण सहकारी संस्था किंवा मुडा अधिकाऱ्यांसह इतर प्रभवशाली व्यक्तींच्या सोईसाठी बनावट असलेल्या व्यक्तींच्या नावावर आहे. या अगोदर म्हैसुरच्या लोकायुक्त पोलिसांनी आयपीसीच्या वेगवगळ्या कलमांतर्गत तसेच 1988 सालाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सिद्धरामय्या तसेच इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या अनुषंगाने चौकशी चालू झाली होती.
त्यामध्येच इडीने १०० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी अर्थात MUDA ने 3 एकर 16 गुंठे जमीन अधिगृहित केली होती. याच जमिनीच्या बदल्यात सिद्धरामय्या यांनी त्यांची पत्नी बीएम पार्वती यांच्या नावाने 14 पॉश भागात जागा नावावर करून घेतल्या होत्या. हा जमीन घोटाळा असल्याचा आरोप आरटीआय च्या एका कार्यकर्त्याने केला होता. ईडीच्या या कारवाईमुळे कर्नाटकच्या राजकारणात एकच गोंधळ उडाला असुन आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे आहे.