ताज्या बातम्या

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार

बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्यासाठी निघालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कर्नाटक पोलिसांनी लाठीमार केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सतेज औंधकर, कोल्हापूर

बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्यासाठी निघालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कर्नाटक पोलिसांनी लाठीमार केला आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल आणि निपाणी सीमा हद्दिवरील दूधगंगा पुलावर ही घटना घडली. यामुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर सुमारे दीड तास तणाव पाहायला मिळाला.

निपाणी, बिदर,भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे...या घोषणांनी आज महाराष्ट्रातील कागल परिसर दणाणून गेलाय. बेळगाव येथे मराठी भाषिकांवरती वारंवार होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव येथे आयोजित केलेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला जाण्यासाठी आज महाविकास आघाडीचे नेते कागल येथे एकत्र आले. यात महाविकास आघाडीचे नेते माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ , उद्घाव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांचे सह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कागलच्या मध्यवर्ती बस स्थानकातून त्यांनी कर्नाटकच्या दिशेने अर्थात निपाणी कडे चालत जाण्यासाठी निघाले. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर जोरदार हल्ला करत घोषणा बाजी केलीय. मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असणाऱ्या दूधगंगा पुलावर कर्नाटक पोलिसांनी बॅरिगेट लावून रस्ता अडवला होता. अखेर कागलवरून बेळगावच्या दिशेने निघालेला हा मोर्चा कर्नाटक पोलिसांनी बळाचा वापर करून अडवला. यावेळी आंदोलन आणि कार्यकर्त्यांच्या जोरदार धक्काबुक्की झाली. यावेळी कर्नाटक पोलिसांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्या वरती लाठीमार केल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. दरम्यान यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे हेही आक्रमक झाले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाला सशर्त दिलेली परवानगी पुन्हा एकदा कर्नाटक सरकारने नाकारल्यानंतर त्यांनी कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध केला आहे.

कर्नाटक पोलीस आणि आंदोलकांत झालेल्या धक्का बुक्की नंतर म्हाविकास आघाडिच्या नेत्यांनी भाषणे झाली त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते हे स्वतः हुन महाराष्ट्र पोलिसांच्या गाडीत जावून बसले. पण महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेवून सोडल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा