Karnataka Road Accident team lokshahi
ताज्या बातम्या

Accident | कर्नाटकात भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू तर 26 जण जखमी

लॉरी आणि खासगी बसची समोरासमोर जोरादार धडक झाली आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

कर्नाटकमधील हुबळी-धारवाडच्या तरीहाळा (Tarihal bypass) बायपासवर (Hubballi Dharwad Bypass) भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात लॉरी आणि खासगी बसची समोरासमोर जोरादार धडक झाली आहे. या अपघातात (Accident) 7 जण ठार जागीच ठार झाले आहेत तर 26 जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये कर्नाटकातील (Karnataka) दोघांचा समावेश आहेत. तर 6 जण कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील होते. अपघातातील जखमींवर हुबळीच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार एक खाजगी प्रवासी बस ही कोल्हापूरहून बंगळूरकडे निघाली होती. याच प्रवासी बसची आणि एका लॉरीची आमने-सामने जोरदार धडक झाली. मध्यरात्री साडेबारा ते एक दरम्यान हा भीषण अपघात घडला आहे. बसचा ड्रायव्हर एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना हा अपघात घडला असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी या अपघाताबाबत एफआयआर नोंदवली असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे हुबळी परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे. हा अपघात इतका भीषण झाला आहे की बसचा समोरील भागाचा पूर्णत: चक्काचूर झाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा