संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अडचणीत सापडलेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहे. निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी तर, वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची सुपारी देखील धनंजय मुंडे यांनीच दिली होती, असं म्हटलं आहे. त्यानंतर आता करुणा मुंडे यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंच्या 11 मोबाईल नंबरबद्दल अन् अनेक काळ्या कारनामांबद्दल करुणा मुंडेंनी भांडा फोडला आहे.
करुणा मुंडे म्हणाले की, "धनंजय मुंडे सारखा जनप्रतिनिधी 11-11 नंबर वापरतो आहे. मुख्यमंत्र्यांकडे मी भेटीची वेळ मागितलेली आहे. परंतु मला वेळ दिली जात नाही. एका मंत्र्याला एवढ्या नंबरची गरज का लागते? हे एवढे नंबर स्वतःकडे ठेवणं लिगल आहे का? त्या सगळ्या मोबाईल नंबरचा सीडीआर काढून चौकशी केली पाहिजे. धनंजय मुंडेंकडे असलेल्या ११ नंबरमध्ये ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या ११ नंबरवरुन मलाही फोन आलेले आहेत. या नंबरवरुनच त्यांनी काळे कारनामे केले आहेत. त्यामुळे सखोल चौकशी झालीच पाहिजे", असं करुणा
तसेच पुढे बीड सरपंच देशमुख हत्या प्रकरणी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या की,"संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा हात आहे, असं मी म्हणणार नाही. कारण माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. बीडमध्ये जे लोक पुढे येण्याचा प्रयत्न करतात, त्यांना संपवलं जातं. ज्यांच्यावर राजकारणी लोकांनी अन्याय केला, त्या पोलिसांनी समोर आलं पाहिजे. निलंबित पीएसआयची साथ सगळ्यांनी दिली पाहिजे. नाहीतर कधीच कुणाला न्याय मिळणार नाही. पापाचा घडा कधी ना कधी भरतो. संतोष देशमुख प्रकरणामुळे यांचे सगळं बाहेर पडलं आहे. या लोकांची अजूनही गुंडागर्दी संपलेली नाही".