Admin
ताज्या बातम्या

Ravindra Dhangekar : कसब्यात भाजपाला धक्का; रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय

गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला.

Published by : Siddhi Naringrekar

गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. कसब्यात भाजपाला धक्का बसला आहे. कसब्याचे काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत.

काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा ११ हजार ४० मतांनी विजय झाला असून हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. हा निकाल भाजपासाठी खूप मोठा धक्का समजला जातो आहे. कसब्यात 28 वर्षानंतर भाजपाचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती.

रविंद्र धंगेकर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही शिवसेनेतून झाली . त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला. मनसेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा पक्षबदल करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धंगेकर हे तब्बल ४ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो! आज लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक