Admin
Admin
ताज्या बातम्या

कसब्यात काँग्रेसकडून रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर

Published by : Siddhi Naringrekar

विधान परिषद निवडणुकांनंतर आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. कसबा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. आज काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. कसब्यात काँग्रेसकडून रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आज सकाळी साडेनऊ वाजता कसबा गणपती व दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन कॉंग्रेसचा उमेदवार अर्ज भरण्यास जाणार असल्याचे शहर कॉंग्रेसच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. महाविकासआघाडी आणि भाजपाचे उमेदवार आज साडेनऊ वाजता आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांचे नाव जाहीर झाले आहे. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे.

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या रमेश जाधवांचा उमेदवारी अर्ज दाखल

Abhijeet Patil: अभिजीत पाटील यांना दिलासा, विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे

2017मध्ये राष्ट्रवादीचं काय ठरलं होतं? सुनिल तटकरे यांनी लोकशाहीला थेट सांगितलं

निवडणुकीदरम्यान 'डीप फेक' रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश