ताज्या बातम्या

कर्नाटकात ऑपरेशन लोटस? आमदारांना ५० कोटींची ऑफर, पोलिसांची फार्महाऊसवर धाड

तेलंगणात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना पक्षांतर करण्यासाठी प्रलोभने देणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी फार्महाऊसवर धाड टाकून ही कारवाई केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

हैद्राबाद : तेलंगणात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना पक्षांतर करण्यासाठी प्रलोभने देणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी फार्महाऊसवर धाड टाकून ही कारवाई केली आहे. यावेळी महत्त्वाच्या व्यक्तीला १०० कोटी आणि प्रत्येक आमदाराला ५० कोटींची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये पी. रोहित रेड्डीसह चार जणांची नावे समोर आली आहेत. दरम्यान, आमदारांनीच पोलिसांना फोन करुन माहिती दिल्याचे समोर येत आहे. सायबराबाद पोलीस आयुक्तांनी याबाबतची माहिती सांगितली.

माहितीनुसार, प्रलोभने देणारी तिघे जण हैद्राबादला आले असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. त्याने रोहित रेड्डीसोबत 100 कोटी रुपयांची डील केल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक आमदाराला पक्ष बदलण्यासाठी ५० कोटींची ऑफरही देण्यात आली होती. हे लोक बनावट ओळखीच्या आधारे हैद्राबादला आले असल्याचेही समजत आहे.

तेंदूरचे आमदार पी रोहित रेड्डी यांच्या फार्म हाऊसवर ही ऑफर देण्यात आली होती. चार आमदारांना मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या प्रगती भवनात नेण्यात आले होते. आमदारांनी याबद्दल माहिती दिल्यानंतर पोलिसांनी धाड टाकत तीनही जणांना ताब्यात घेतले आहे. या आमदारांनी पोलिसांना त्यांना पक्ष बदलण्यासाठी प्रलोभने देत असून मोठमोठे पैसे, कंत्राटे आणि पदांची ऑफर दिल्याचे सांगितले आहे. तेलंगण राष्ट्र समितीच्या चार आमदारांना ऑफर देण्यात आली होती.

दरम्यान, 2019 पासून भाजप तेलंगणात ऑपरेशन लोटस सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दावे केले जात आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या बंडाने उद्धव ठाकरे सरकार पाडले. तेव्हा महाराष्ट्रातील राजकीय गोंधळानंतर अशा दाव्यांना आणखी हवा मिळाली. अलीकडेच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही भाजप दिल्ली आणि पंजाबमधील आमदारांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला होता. ऑगस्टमध्ये एका भाजप नेत्याने दावा केला होता की सुमारे 18 टीआरएस आमदार लवकरच भाजपमध्ये सामील होतील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा